*अहंकार कसा घालवाल*
अहंकाराचे मूळ खालील गोष्टींमध्ये असते-
(१) अज्ञान
(२) स्वत:बद्दलचा
फाजील आत्मविश्वास
(३) नकार पचवण्याची
कला अवगत नसणे
(४) स्वत:पाशी
असलेले अधिकार
(५)आध्यात्मिक
विचारांची वानवा.
अहंकारामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होते. यामुळे मन:शांती बिघडते, सारासार
विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात. मानसिक तज्ज्ञांच्या मते
मनुष्य म्हटला की अहंकार आलाच. हा अहंकार हिंस्र श्वापदासारखा असतो. त्यावर
नियंत्रण ठेवून त्याला आपल्या आज्ञेत ठेवणे यातच खरी प्रगल्भ माणसाची कसोटी लागते.
*तेव्हा आज बघू, करिअरमध्ये यशस्वी
होण्यासाठी आवश्यक असलेले अहंकाराचे दमन.*
० जेव्हा आपल्याला ठाऊक असते की, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला अधिक
ज्ञान आहे तेव्हा बढाया मारून स्वत:चे गुणगान करणे टाळा. यामुळे अहंकार वाढीला
लागत नाही.
० एखाद्याच्या छोटय़ा-मोठय़ा चुकीमुळे/ वागणुकीमुळे आपला अहंकार
दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी क्षमाशील वृत्ती अंगी बाणवा.
० जसा आपल्याला दुसऱ्याची चूक दाखवून देण्याचा अधिकार आहे तसा
समोरच्यालाही आहे, हे विसरू नका. आपली चूक असल्यास मोठय़ा मनाने मान्य करा. आपल्या
उणिवांवर बोट ठेवले गेल्यास अहंकार दुखावून घेऊ नका, उलट ‘निंदकाचे घर असावे शेजारी,’ या न्यायाने चूक
सुधारा व यश संपादन करा.
० काही लोक खुशमस्करे असतात. आपली खोटी स्तुती करून आपल्या
अहंकाराला खतपाणी घालतात. अशा लोकांचे खरे मनसुबे ओळखा. कारण वेळ आल्यास हीच मंडळी
आपले पाय खेचतात.
० अधिकारपद असल्यामुळे लोक आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात, पण तेच पद गेल्यावर
तेच लोक आपला अपमानही करतात.
० मला आता सर्व कळते, असे वाटू लागल्यास, नवीन जे आपण कधीही
ऐकलेले / पाहिलेले नाही ते शिकायचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्ञानसागर किती अपार आहे
व आपली ज्ञानाची घागर किती थोटी आहे, हे कळेल. आपसूकच त्यामुळे अहंकाराचे
दमन होईल.
० उत्तम, देखणे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून सर्व लोकांवर आपली भुरळ पडेल
हा फाजील आत्मविश्वास / अहंकार बाळगू नका. कारण विचारांची श्रीमंतीच आदरास पात्र
असते. लक्षात ठेवा, फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते. तद्वत आपल्या ज्ञान, व्यक्तिमत्त्वाला
नम्रतेची झालर असावी.
० मी-माझे भौतिक सुख या सर्व कल्पनांना तिलांजली द्या. दुसऱ्याचा
विचार करा, यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीस मिळाल्यास आपला अहंकार
दुखावला जाणार नाही.
० दुसऱ्यांना शिकविण्यापेक्षा, दुसऱ्यांकडून जास्तीत जास्त शिका.
दुसऱ्यांमधील चांगले गुण आत्मसात करा, त्यामुळे आपल्यालाही शेरास सव्वाशेर
भेटल्याचे कळेल व आपसूकच आपला अहंकार निवळून जाईल.
० निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. एखादी गोष्ट चांगली घडून
आल्यास आपण फक्त निमित्तमात्र आहोत. सगळी मेहनत ज्याचे काम झाले त्यानेच केली आहे
व देवाने हे सर्व घडवून आणले आहे, असा आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगा. त्यामुळे अहंकार वाढणार नाही.
आठवा- शिवाजी महाराज-रामदास व बेडकीची गोष्ट. जेव्हा महाराजांना अहंकार जडला की
आपण रयतेचे पोशिंदे आहोत तेव्हा रामदासांनी खडक फोडून त्यात जिवंत असणारी बेडकी व
पाण्याचे खळगे दाखवले. महाराजांना कळून चुकले की, ही सर्व देवाची लीला आहे. मनुष्यमात्र
निमित्तापुरता असतो.
० दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करणे टाळा. कारण आपण पुढे गेलो तर अहंकार
वाढतो व दुसरा पुढे गेला तर अहंकार दुखावतो. त्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा.
चांगले काम केल्यास ते अजून कसे उत्तम करता येईल यासाठी परफेक्शनचा ध्यास घ्या.
० सर्वात शेवटी अहंकार हा अनेक प्रयत्नांतीच काबूत येतो, त्यामुळे नेहमी
अंतरात्म्याशी संवाद साधा, आपले बोलणे ओठावर येण्यापूर्वीच अहंकाराचा दर्प नाही ना हे अवश्य
तपासा, मग बघा- तुम्ही अजातशत्रू तर व्हालच, पण करिअरमध्येपण सर्वोच्च स्थानावर
जाल.
--------------------------------------------------------------------------------------------------------
पालकत्वाची व्याख्या
जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष
घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. सध्याची पालकाची व्याख्या काय ? जास्तीतजास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला
देणे आणि महागड्या शिकवणीवर्गाला पाठवले की, यांचे कर्तव्य संपले. याने आपण आपल्या
मुलाला भोगी बनवत आहोत. भोगाच्या आधाराने अनेक विकार जन्म घेतात. भोगी व्यक्ती
अनेक दोषांना जन्म देते. तर त्यागी व्यक्ती सद्गुणांना जन्म देते. तेव्हा पालकांनी
अंतर्मुख होऊन विचार करायला हवा की, मी मुलाला खरोखरीचे शिक्षण देत आहे का ? ‘एखाद्या जिवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे’, हाच पालकाचा धर्म
आहे.
आनंदी पालकच आनंदी
पिढी घडवू शकत असणे
आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो.
पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः
तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात. आपल्या
पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणार्या पालकांशी संवाद करावासा
वाटत नाही. त्यांना सुचणार्या नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या तणावग्रस्त
असणार्या पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त
असायला हवा.
पालकांच्या मनावर
ताण येण्यामागील कारणे
३ अ. सतत भूतकाळात रहाणे : सतत भूतकाळात वावरणारे पालक
मुलांशी संवाद साधू शकत नाहीत. मुले सतत वर्तमानकाळात जगतात; म्हणून ती सतत आनंदी असतात. आपण
आपल्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग आणि घटना सतत आठवत रहातो. ‘शेजार्याशी घडलेला प्रसंग’, ‘सासूबाई वाईट बोलल्या’, ‘कार्यालयात अधिकारी बोलले’, या विचारांचे ओझे बहुतेकजण वहात
असतात. सहाजिकच मुले काही सांगत असतील, तर आपण त्यांचे विचार ऐकण्याच्या
स्थितीत नसतो. तेव्हा आपण सतत वर्तमानकाळात रहायला शिकले पाहिजे. आपण भूतकाळाच्या
विचारात वावरत असल्याने मुले आणि आपण यांच्यात सुसंवाद होऊ शकत नाही.
३आ. नकारात्मक बोलणे : ‘तुला काही येत नाही, तुझा काही उपयोग नाही’, अशा नकारात्मक
बोलण्याने मुलांच्या मनावर घाव होतात. एक वेळ स्थूलदेहावर केलेले घाव भरून निघतात; पण जिवाच्या मनावर
झालेले घाव आपण भरून काढू शकत नाही. तेव्हा मुलांशी बोलतांना सतत सकारात्मक
बोलायला हवे. आपल्या बोलण्यातून मुलांना प्रोत्साहन मिळायला हवे.
३ इ. स्वतःच्या चुका मुलांसमोर
मान्य न करणे : स्वतःच्या चुका मान्य केल्याने मनावरचा ताण अल्प होतो. मुलांच्या
मनात आपल्याविषयी आदराचे स्थान निर्माण होते. आपले पाहून मुलेही प्रामाणिकपणे चुका
मान्य करायला शिकतात. आपण चूक लपवली, तर प्रथम आपल्या मनावर ताण येतो.
मुलांना आपल्या सर्व चुका कळतात. ‘बाबा आणि आई स्वतःच्या चुका मान्य करत
नाहीत, मग मी का कराव्यात’, असे त्यांना वाटू लागते. त्यामुळे पालक आणि मुले यांच्यात
सूक्ष्म-दरी निर्माण होते.
३ ई. मुलांचे सतत दोष पहाणे : मुलांमधील दोष सतत
पाहिल्याने आपल्या मनावर ताण येतो. आपण मुलांचे गुण पहावेत आणि त्यांचे कौतुक
करावे. पर्यायाने मुले स्वतःचे दोष स्वीकारून ते घालवण्यासाठी प्रयत्न करतात; पण बरेच पालक मुलांना
सतत दोषच दाखवतात. ‘मुलांचे सतत दोषच पहाणे – तणाव आणि मुलांचे सतत गुण पहाणे – आनंद’, हे सूत्र आचरणात आणले, तर ताण न्यून होण्यास
साहाय्य होते.
३ उ. स्वतःची प्रतिमा जपत बोलणे
: पालक व्यवहारातील त्यांच्या पदाला चिकटून बोलतात. ते स्वतःला विसरत
नाहीत. ‘मी आधुनिक वैद्य आहे’, ‘मी अभियंता आहे’ किंवा ‘मी अधिकारी आहे’, ही प्रतिमा जागृत
ठेवून बोलण्याने पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद कदापी होणार नाही. उलट पालकांना
ताण येतो आणि मुले ऐकत नाहीत. ‘पालक’ या भूमिकेत येऊन मुलांशी सहजतेने बोलायला हवे. ‘व्यवहारातील प्रतिमा
ठेवून बोलणे – ताण आणि मुलांचा पालक म्हणून बोलणे – आनंद’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे.
३ ऊ. अधिकारवाणीने बोलणे : आपण मुलांशी बोलतांना अधिकारवाणीने
बोललो, तर त्यांना ताण येतो. मुलांना आपले बोलणे आवडत नाही. अधिकारापेक्षा
आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे. आपणाला स्वतःलाही कोणी एखादी गोष्ट
अधिकारवाणीने सांगितली, तर ती स्वीकारावीशी वाटत नाही. तसेच हे आहे. ‘आधिकारवाणीने बोलणे – तणाव आणि प्रेमाने
बोलणे – आनंद’, हे सूत्र आचरणात आणायला हवे.
३ ए. ‘मुलांमध्ये ईश्वरीतत्त्व आहे’, असा विचार न करणे : ‘प्रत्येक मुलात देव आहे’, याची जाणीव ठेवून संवाद साधायला हवा.
मुलातील ईश्वरी तत्त्वाचा आदर करूनच बोलावे. मी ‘व्यक्तीशी बोलत नसून तत्त्वाशी बोलत आहे’, असा सतत विचार केला, तर मुलांशी सहज संवाद
होईल आणि तणाव दूर होईल. त्यासाठी ‘व्यक्ती म्हणून बोलणे – तणाव आणि ईश्वरी
तत्त्वाशी बोलणे – आनंद’, या सूत्राकडे सतत लक्ष ठेवायला हवे.
३ ऐ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, हे तत्त्व समजून व्यवहार न करणे
: पालकांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. आपल्या मुलाची प्रकृती कोणती आहे, त्याची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक
क्षमता या सर्वांचा विचार पालकांनी करायला हवा. स्पर्धावृत्ती आणि समाजातील
स्वतःची प्रतिमा यांनुसार काही पालक मुलांशी व्यवहार करतात. पर्यायाने मुले आणि
पालक यांच्यात तणाव निर्माण होतो. असे होऊ नये, याकरिता ‘मुलाची प्रकृती समजून संवाद – आनंद आणि मुलाची
प्रकृती समजून न घेता संवाद – तणाव’, हे सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
३ ओ. समजावून न सांगणे : मुलांना प्रत्येक गोष्ट समजावूनच
सांगावी. सम म्हणजे मुलांच्या स्तराला जाऊन सांगणे. मुलगा पहिलीत असेल, तर पालकांनी त्याच्या
स्तराला येऊन संवाद साधावा. यामुळे मुले आपले ऐकतात; पण पालक स्वतःच्याच स्तरावर रहातात.
त्यामुळे मुले ऐकत नाहीत. पालकांच्या अहंकारामुळे असे घडते. ‘मुलांच्या स्तराला
येऊन बोलणे – आनंद आणि स्वतःच्या स्तराला राहून बोलणे – तणाव’, हे सूत्र आचरणात आणले, तर तणाव न्यून होतो.
३ औ. मुलांशी संवाद नसणे : सध्या मुलांच्या
समस्या ऐकून घेणारे कोणीच नसते. पालक म्हणतात, ‘आम्हाला कामे आहेत’, तर शिक्षक म्हणतात, ‘आम्हाला आमचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा
आहे.’ पर्यायाने आज मुलांची फार मोठी मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे
पालकांविषयी मुलांच्या मनात आदर आणि विश्वास राहिला नाही. मग मुले ऐकत नाहीत; म्हणून पालकांच्या
मनावर ताण येतो. अनौपचारिक बोलल्यामुळे मने जुळतात. याकरिता मुलांशी प्रतिदिन १५
मिनिटे अनौपचारिक बोलणे आवश्यक आहे. यातून मुले मोकळी होतात. ‘प्रतिदिन मुलांशी १५
मिनिटांचे अनौपचारिक बोलणे – आनंद आणि प्रतिदिन अनौपचारिक बैठक नसणे – तणाव’, हे सूत्र लक्षात घेऊन
त्याप्रमाणे वागल्यास पालक मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात.
३ अं. अपेक्षा करणे : आपण मुलांकडून
अपेक्षा ठेवून व्यवहार करत असू, तर मुलांना आपले बोलणे आवडत नाही. त्यांच्यात अहं अल्प असल्यामुळे
त्यांना अपेक्षेची स्पंदने कळतात. आपण निरपेक्षपणे त्यांच्याशी व्यवहार करावा.
जेथे निरपेक्षता आहे, तेथेच प्रेम आहे. ‘म्हातारपणी मुलगा माझा सांभाळ करील. समाजातील माझी पत टिकविल आणि
वाढविल’, अशी अपेक्षा करण्यापेक्षा ‘देव माझा सांभाळ करील’, असा विचार करणे योग्य
ठरेल; कारण ‘अपेक्षा करून व्यवहार – तणाव आणि निरपेक्षपणे व्यवहार – आनंद.’
१. पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.
२. प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.
३. सांगतांना आपली कृती तपासावी.
४. मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्या
टाळाव्यात म्हणजे मुलांनाही आणिआपल्यालाही ताण येणार नाही.
५. मुलांना पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. हे तत्त्व
नेहेमी लक्षात घ्यावे.
६. पाल्यासाठी स्वतःचा जास्तीतजास्त वेळ द्यावा.
७. मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.
८. स्वतःची चूक झाली असल्यास ती मुलांसमोर मान्य करावी.
९. प्रत्येकाची प्रकृती ही निरनिराळी असल्याने पालकांनी आपल्या
मुलाची तुलना कधीहीदुसर्या मुलाबरोबर करू नये.
१०. मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये. (‘तुला कळत नाही, तुला येतनाही, तुला जमणार नाही, तू कधी शांत होणार ?, याने मला खूप डोक्याला ताप
दिलाआहे’, अशी
नकारात्मक भाषा वापरल्याने मुलांच्या बालमनावर परिणाम होऊनत्यांच्याशी जवळीक साधता
येत नाही.)
११. घरात नवीन आलेल्यांसमोर (पाहुण्यांसमोर) मुलांचे दोष
सांगितले जातात. तेथे तेसांगण्याऐवजी मुलांनाच ते प्रेमाने सांगावे.
१२. आपला पाल्य काय करत नाही, हे सांगण्यापेक्षा तो काय चांगले करतो, ते इतरांनासांगावे; मात्र त्याचे अवास्तव कौतुक करू
नये.
१३. मुलांकडूनही शिकण्याचा स्थितीत रहाणे.
१४. पालकांनी स्वतः देवभक्ती केली, तसेच स्वतःचे आचरण मुलांसमोर
आदर्शठेवल्यास तीही त्याचे अनुकरण करतील.
१५. ‘मुलांचा
पालनकर्ता मी नसून भगवंत आहे’, याची जाणीव ठेवावी. (त्यामुळे ताणयेत नाही.)
१ मुलांना मनातले कसे बोलू द्याल?
बायबल काय म्हणते: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा . . . असावा.” (याकोब १:१९) मुले तुमच्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतात हे
त्यांना कळू द्या. त्यांना बोलायचे असते तेव्हा तुम्ही ऐकण्यास तयार असता असे
त्यांना वाटले पाहिजे. कोणताही संकोच न बाळगता मुलांना मनातले बोलता यावे असे
खेळीमेळीचे, निवांत वातावरण तयार करा. (याकोब ३:१८) आई-वडिलांना मनातले सांगितल्यास ते रागावतील किंवा आपल्यालाच दोष
देतील असे जर मुलांना वाटले, तर ते कदाचित मनातले बोलणार नाहीत. तेव्हा, मुलांशी धीराने
वागा आणि तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे याचे त्यांना वेळोवेळी आश्वासन द्या.—
तुम्ही काय करू शकता:
- मुलांना तुमच्याशी बोलायचे असते तेव्हा त्यांना वेळ द्या
- समस्या उद्भवतात तेव्हाच नव्हे,
तर नियमितपणे त्यांच्याशी संवाद साधा
२ त्यांना नेमके काय म्हणायचे ते
समजून घ्या
बायबल काय म्हणते: “बोलण्याकडे लक्ष देणाऱ्याचे
कल्याण होते.” कधीकधी, मुलांच्या मनात नेमके काय चालले आहे
हे जाणून घेण्यासाठी केवळ त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊन चालणार नाही; तर तुम्हाला त्यांच्या भावनाही
समजून घ्याव्या लागतील. मुलांना एखादी गोष्ट वाढवून सांगायची किंवा नकळत बरेच काही
बोलायची सवय असते. तेव्हा, लगेच
त्यांच्यावर चिडू नका. कारण बायबल म्हणते: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर
देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.”—
·
मुले तुम्हाला
काहीही सांगो, त्यांना मधेच तोडू नका किंवा तिखट प्रतिक्रिया दाखवू नका
·
तुम्ही त्यांच्या
वयाचे होता तेव्हा तुम्हाला कसे वाटायचे व तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी
महत्त्वाच्या होत्या ते आठवा
३ मुलांसमोर मतभेद नको
वर्गात *सातत्याने* त्रास देणे.
टीचर्स शी *उद्धटपणे* बोलणे.
*सातत्याने* होमवर्क नाही करणे.
नेहमी *टीचर वर कमेंट्स* करणे.
दुसऱ्या मुलांना *नेहमी* मारणे.
शिक्षक शिकवत असताना वर्गात *सातत्याने* उठणे बसणे.
मुलामुलींची मैत्री व्यतिरिक्त *जोड्या लावणे*.
*गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड* म्हणून लेटर देणे किंवा चॉकलेट देणे.
गुपचुप न सांगता सोशल मीडियावर *ॲक्टिव्ह* राहणे
*नेहमीच* अभ्यास न करणे.
*शिव्या देणे,* बॅड वर्ड वापरणे.
*बस मध्ये* सर्वांना त्रास देणे.
बस मध्ये आरडाओरड करणे.
बस मधील सांभाळणाऱ्या मावशी त्यांच्याशी? *उद्धट वागणे* कधी
कधी तर त्यांना धमक्या देणे तुम्हाला काय करायचे ते करा.
शिक्षकांची मस्करी आणि *उलट उत्तर देणे.*
शाळेमध्ये चॉकलेट वाटणे.
*शालेय शिस्त न पाळणे.*
डोक्याचे केस, नखे किती ही सूचना देऊन न कापणे
वर्गाबाहेर येऊन उभे राहणे टाईमपास करणे.
*अन्नाचा अपमान करणे* आणि उरलेला डबा हा फेकून देणे.
खोटे बोलणे: टीचर समोर अतिशय भोळा चेहरा करून उभे राहणे आणि
*"मी त्यातला नाहीच"* अशी भावना आणणे आणि पालकांना गुंडाळणे.
जिन्यामध्ये *ढकलाढकली* करणे.
शाळेत जिथे कॅमेरा जिथे लावला नाहीये अशा ठिकाणी एकत्र येणार तिथे मारामारी करणे, धमक्या देणे, *खासकरून टॉयलेट..*
शिक्षक शिकवत असताना त्यांनी दिलेल्या सूचना या ऐकून न ऐकणे.. *लक्ष देणे नाही*
या काही विद्यार्थ्यांच्या
वर्तणूक समस्या..
*विद्यार्थ्यांचे समुपदेशन झाले, प्रेमाने बोलून झाले, त्याची वर्तणूक सुधारण्यासाठी मेहनत घेतली, प्रेरणादायी कार्यक्रम घेतले, सेक्स एज्युकेशनचे परिसंवाद घेतले, सायबर क्राईम ची व्याख्याने घेतले, अभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शन दिले, तरीसुद्धा वरील अवगुण काही विद्यार्थ्यांन मध्ये येतात. ते स्वतःमध्ये बदल करत नाही. अधिक वाईट दिशेने जातात. हे असे का होते?*
किंवा
वरील पैकी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाईट गुण असलेल्या सहावी च्या पुढील काही विद्यार्थ्यांमध्ये हे अवगुण का येतात? *त्याची कारणे खालीलप्रमाणे..*
जेव्हा शाळा त्याला शिस्त लावायचा प्रयत्न करते त्या वेळेस पालक त्यात दखल अंदाज करतात.
विद्यार्थी त्यांची एकच बाजू पालकांसमोर मांडतात आणि पालक डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतात.
विद्यार्थी त्यांची एकच बाजू शिक्षकांसमोर मांडतात, सातत्याने एस्क्युज देतात.. कारणे देतात.
शिक्षकांनी त्या मुलाला शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना केली तर पालक शाळेत वाद घालायला येतात किबहुना भांडतात सुद्धा.
माझा मुलगा याच्यात कधीच नसेल अशा अंधश्रद्धा मध्ये अडकतात.
ज्यावेळेस पालकांना लक्षात येते आपल्या मुलाची चूक आहे तरीसुद्धा
ते पालक नजर अंदाज करतात दुर्लक्ष करतात.
जिथे मुलांनी पालकांना घाबरला पाहिजे अशा ठिकाणी पालकच मुलांना घाबरतात "तो काही तरी करून घेईल".
पालकांचे खासकरून आईचे अति आंधळ प्रेम.
माझ्या मुलाला काहीच व्हायला नाही पाहिजे या भावनेतून अतिकाळजी.
मुलगा अभ्यास करतो आहे की नाही..क्लासला जातो आहे की नाही.. होमवर्क करतोय की नाही.. बॅग नुसार टाइम टेबल भरले आहे की नाही.. यासंदर्भात पालकांचा निष्काळजीपणा.
शाळेतून आल्यानंतर मुलाला दोन तास ट्युशनला पाठवणे म्हणून खेळायची संधी न मिळणे.
आईवडीलच सोशल मीडिया मध्ये इतके अडकणे की मुलाचे ऐकले पाहिजे.. त्याच्याशी संवाद साधला पाहिजे या बाबत निष्काळजी असणे.
टीचर, मुख्याध्यापक यांना लाईटली घेणे.
फी भरली म्हणजे शाळा विकत घेतली अशी भावना ठेवणे.
अभ्यास मध्ये एक नंबर, डान्स स्पोर्ट्स मध्ये सुद्धा एक नंबर, चांगल्या सवयी
लागणे, त्याला आदर्श व्यक्ती घडवणे हे सर्व काम फक्त आणि फक्त शाळेचे
असतात आणि याच्यात आई-वडिलांचा काही संबंध नसतो अशी भावना पालकांनी ठेवणे.
मुलाला माहिती असणे की शाळा कितीही म्हटले तरी आपल्याला शाळेतून ते काढणार नाही.
घरात आजी-आजोबांचं नातवांच्या चुकांवर पांघरूण घालने.
सातत्याने कुरकूर करणारे पालक खास करून व्हाट्सअप वर ग्रुप करून
नेहमी मी ही टीचर वाईट टिचर वाईट तिला असं शिकवता येत नाही तिला प्रसन्न शिकवता
येत नाही या पद्धतीने कमेंट करणे.
ओपन हाउस मध्ये विद्यार्थ्यांसमोर टीचर शी पालक उद्धटपणे बोलणे.. प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीचे ठेवणे.
आपल्या मुलाचे कॉलनी मधले कोण मित्र आहेत? त्याच्या वयापेक्षा मोठे मित्र-मैत्रिणी आहेत का? याबद्दल माहिती नसणे किंवा माहिती असली तरी कानाडोळा करणे..दुर्लक्ष करणे.
पालकांचा मूळ स्वभावत अति शांत घाबरट आणि मुलांसमोर हात टेकणे असा
असणे.
आपला मुलगा चोरी करतोय खोटं बोलतोय हे माहिती असूनही त्याला पदरात घेणे.
खूप कमी वयात मोबाईल हातात देणे.
सायन्स प्रोजेक्ट च्या नावाखाली किंवा अभ्यासाच्या नावाखाली खूप लवकर इंटरनेट वापरण्याची संधी देणे त्यावर लक्ष न ठेवणे.
आपल्या मुलाची दुसऱ्या मुलांबरोबर सतत तुलना करणे.
दोन भावा मध्ये भाऊ-बहिणी मधील तुलना करणे.. की ही बघ तुझी मोठी बहीण किती छान वाटते आणि तुला छान वागता येत नाही वगैरे वगैरे..
मुलांना वेळ न देणे.
शाळेच्या सुचना, मोबाईल ॲप, डायरी, सरक्यूलर याकडे दुर्लक्ष असणे.
ज्या गोष्टी मुलांनी ऐकायला नाही पाहिजे त्यामुलाने देखत चर्चा करणे
पालकांचा बस ड्रायव्हर, मावशी यांना माणूस म्हणून सन्मानाने
वागणूक न देणे त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे
शाळा मुलांवर मेहनत करा तयार असताना त्यांना अपराधी च्या दारात उभा करून त्यांना नावे ठेवणे
"मुलाचा विकास हा शाळेतील सहा तासांमध्येच होतो" अशा प्रकारचे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे.
आईने मुलाच्या संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. १०० पैकी १००
मार्कांसाठी मुलांच्या अभ्यासाच्या चुकांपासून शिक्षकांच्या चुका काढण्यापर्यंत
पालक पोहोचणे
पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फक्त शिक्षक कसे चुकीचे होते आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही यावरच चर्चा करणे
येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. याबद्दल पालकांचे अज्ञान असणे
वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला. त्यात हायपरऍक्टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला. अशा वेळेस शिक्षकांना सहकार्य करण्यापेक्षा त्यांना धारेवर धरणे.
शाळेने विद्यार्थ्यांना दिलेल्या स्वातंत्र्य याचा चुकीचा अर्थ काढून शिस्ते न पाळणे या धोरणाला सपोर्ट करणे.
कायद्यानुसार विद्यार्थ्यांना मारता येत नाही या शब्दाचा अर्थ म्हणजे थोडी चापट सुद्धा मारली म्हणजे खूपच त्याला मारले आहे असं समजणे आणि त्या नुसार प्रतिकिया देणे.
हा पूर्ण लेख वाचल्यानंतर हा लेख माझ्यासाठी नव्हताच असं समजून दुर्लक्ष करणारे पालक.
हा लेख वाचल्यानंतर "लेखकाच्या मनात शिस्त लावण्यासाठी मुलांना मारलेच पाहिजे" असा सोयीचा अर्थ काढणारे पालक.
*टीप: मला मनापासून वाटते की विद्यार्थी स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करू शकतात पण एकटा शाळेच्या प्रयत्नाने नाही तर पालक आणि शाळा जेव्हा एकत्र येऊन मुलाच्या विकासासाठी हातात हात घालून सहकार्याची भावनेने करतात त्याच वेळेस विद्यार्थ्यांमध्ये विधायक बदल घडतात.*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पालकत्वाची व्याख्या
जो स्वत:च्या मुलाला त्याच्यातील दोष
घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक.
सध्याची पालकाची व्याख्या काय? जास्तीत जास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला देणे आणि महागडय़ा शिकवणी वर्गाला पाठवले की, यांचे कर्तव्य संपले. याने आपण आपल्या मुलाला भोगी बनवत आहोत. भोगाच्या
आधाराने अनेक विकार जन्म घेतात. भोगी व्यक्ती अनेक दोषांना जन्म देते, तर त्यागी व्यक्ती सद्गुणांना जन्म देते. तेव्हा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार
करायला हवा की, मी मुलाला खरोखरीचे शिक्षण देत आहे का? एखाद्या जीवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे हाच पालकाचा धर्म आहे.
आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू
शकत असते
आनंदी
पालकच आनंदी पिढी घडवू शकतो. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात
सुसंवाद असायला हवा. स्वत: तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन
जगायला शिकवू शकतात. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणा-या
पालकांशी संवाद करावासा वाटत नाही. त्यांना सुचणा-या नवीन कल्पना, विचार आणि स्वत:च्या समस्या
तणावग्रस्त असणा-या पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वत:
तणावमुक्त असायला हवा.
पालकांच्या मनावर ताण
येण्यामागील कारणे सतत भूतकाळात राहाणे :
सतत
भूतकाळात वावरणारे पालक मुलांशी संवाद साधू शकत नाहीत. मुले सतत वर्तमानकाळात
जगतात; म्हणून
ती सतत आनंदी असतात. आपण आपल्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग आणि घटना सतत आठवत
राहातो. शेजा-याशी घडलेला प्रसंग, सासुबाई वाईट बोलल्या, कार्यालयात अधिकारी बोलले, या विचारांचे ओझे बहुतेकजण
वाहत असतात. साहजिकच मुले काही सांगत असतील, तर आपण त्यांचे विचार
ऐकण्याच्या स्थितीत नसतो. तेव्हा आपण सतत वर्तमानकाळात राहायला शिकले पाहिजे. आपण
भूतकाळाच्या विचारात वावरत असल्याने मुले आणि आपण यांच्यात सुसंवाद होऊ शकत नाही.
नकारात्मक बोलणे :
तुला
काही येत नाही, तुझा
काही उपयोग नाही, अशा
नकारात्मक बोलण्याने मुलांच्या मनावर घाव होतात. एक वेळ स्थूलदेहावर केलेले घाव
भरून निघतात; पण
जीवाच्या मनावर झालेले घाव आपण भरून काढू शकत नाही. तेव्हा मुलांशी बोलताना सतत
सकारात्मक बोलायला हवे. आपल्या बोलण्यातून मुलांना प्रोत्साहन मिळायला हवे.
स्वत:च्या चुका मुलांसमोर
मान्य न करणे :
स्वत:च्या
चुका मान्य केल्याने मनावरचा ताण अल्प होतो. मुलांच्या मनात आपल्याविषयी आदराचे
स्थान निर्माण होते. आपले पाहून मुलेही प्रामाणिकपणे चुका मान्य करायला शिकतात.
आपण चूक लपवली, तर
प्रथम आपल्या मनावर ताण येतो. मुलांना आपल्या सर्व चुका कळतात. बाबा आणि आई
स्वत:च्या चुका मान्य करत नाहीत, मग मी का कराव्यात, असे त्यांना वाटू लागते.
त्यामुळे पालक आणि मुले यांच्यात सूक्ष्म-दरी निर्माण होते.
मुलांचे सतत दोष पाहणे :
मुलांमधील
दोष सतत पाहिल्याने आपल्या मनावर ताण येतो. आपण मुलांचे गुण पाहावेत आणि त्यांचे
कौतुक करावे. पयार्याने मुले स्वत:चे दोष स्वीकारून ते घालवण्यासाठी प्रयत्न करतात; पण बरेच पालक मुलांना सतत
दोषच दाखवतात. मुलांचे सतत दोषच पाहणे-तणाव आणि मुलांचे सतत गुण पाहणे-आनंद हे
सूत्र आचरणात आणले, तर
ताण न्यून होण्यास साहाय्य होते.
स्वत:ची प्रतिमा जपत बोलणे :
पालक
व्यवहारातील त्यांच्या पदाला चिकटून बोलतात. ते स्वत:ला विसरत नाहीत. मी आधुनिक वैद्य
आहे, मी
अभियंता आहे किंवा मी अधिकारी आहे, ही प्रतिमा जागृत ठेवून
बोलण्याने पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद कदापी होणार नाही. उलट पालकांना ताण
येतो आणि मुले ऐकत नाहीत. पालक या भूमिकेत येऊन मुलांशी सहजतेने बोलायला हवे.
व्यवहारातील प्रतिमा ठेवून बोलणे-ताण आणि मुलांचा पालक म्हणून बोलणे-आनंद हे सूत्र
लक्षात ठेवायला हवे.
अधिकारवाणीने बोलणे :
आपण
मुलांशी बोलताना अधिकारवाणीने बोललो, तर त्यांना ताण येतो.
मुलांना आपले बोलणे आवडत नाही. अधिकारापेक्षा आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलायला
हवे. आपणाला स्वत:लाही कोणी एखादी गोष्ट अधिकारवाणीने सांगितली, तर ती स्वीकारावीशी वाटत
नाही. तसेच हे आहे. अधिकारवाणीने बोलणे-तणाव आणि प्रेमाने बोलणे-आनंद हे सूत्र
आचरणात आणायला हवे.
व्यक्ती तितक्या प्रकृती हे
तत्त्व समजून व्यवहार न करणे :
पालकांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती
आहेत. आपल्या मुलाची प्रकृती कोणती आहे, त्याची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक क्षमता
या सर्वाचा विचार पालकांनी करायला हवा. स्पर्धावृत्ती आणि समाजातील स्वत:ची
प्रतिमा यानुसार काही पालक मुलांशी व्यवहार करतात. पर्यायाने मुले आणि पालक
यांच्यात तणाव निर्माण होतो. असे होऊ नये, याकरिता मुलाची प्रकृती
समजून संवाद-आनंद आणि मुलाची प्रकृती समजून न घेता संवाद-तणाव हे सूत्र लक्षात
ठेवणे आवश्यक आहे.
समजावून न सांगणे :
मुलांना
प्रत्येक गोष्ट समजावूनच सांगावी. सम म्हणजे मुलांच्या स्तराला जाऊन सांगणे. मुलगा
पहिलीत असेल, तर
पालकांनी त्याच्या स्तराला येऊन संवाद साधावा. यामुळे मुले आपले ऐकतात; पण पालक स्वत:च्याच स्तरावर
राहतात. त्यामुळे मुले ऐकत नाहीत. पालकांच्या अहंकारामुळे असे घडते. मुलांच्या
स्तराला येऊन बोलणे-आनंद आणि स्वत:च्या स्तराला राहून बोलणे- तणाव हे सूत्र आचरणात
आणले, तर
तणाव न्यून होतो.
मुलांशी संवाद नसणे :
सध्या
मुलांच्या समस्या ऐकून घेणारे कोणीच नसते. पालक म्हणतात, आम्हाला कामे आहेत, तर शिक्षक म्हणतात, आम्हाला आमचा अभ्यासक्रम
पूर्ण करायचा आहे. पर्यायाने आज मुलांची फार मोठी मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे
पालकांविषयी मुलांच्या मनात आदर आणि विश्वास राहिला नाही. मग मुले ऐकत नाहीत; म्हणून पालकांच्या मनावर
ताण येतो. अनौपचारिक बोलल्यामुळे मने जुळतात. याकरिता मुलांशी प्रतिदिन १५ मिनिटे
अनौपचारिक बोलणे आवश्यक आहे. यातून मुले मोकळी होतात. प्रतिदिन मुलांशी १५
मिनिटांचे अनौपचारिक बोलणे-आनंद आणि प्रतिदिन अनौपचारिक बैठक नसणे-तणाव हे सूत्र
लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागल्यास पालक मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू
शकतात.
अपेक्षा करणे :
आपण मुलांकडून अपेक्षा ठेवून व्यवहार करत
असू, तर मुलांना आपले बोलणे आवडत नाही. त्यांच्यात अहं अल्प असल्यामुळे त्यांना अपेक्षेची स्पंदने कळतात. आपण
निरपेक्षपणे त्यांच्याशी व्यवहार करावा. जेथे निरपेक्षता आहे, तेथेच प्रेम आहे. म्हातारपणी मुलगा माझा सांभाळ करील. समाजातील माझी पत टिकवील
आणि वाढवील, अशी अपेक्षा करण्यापेक्षा देव माझा सांभाळ
करील, असा विचार करणे योग्य ठरेल; कारण अपेक्षा करून व्यवहार तणाव आणि
निरपेक्षपणे व्यवहार आनंद या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणत पाल्यांशी संवाद
साधल्यास एक चांगला विद्यार्थी म्हणून प्रत्येक पालक आपल्या पाल्याला नक्कीच घडवू
शकेल.
B.M.MAGDUM
No comments:
Post a Comment